आता रेल्वे स्थानकावर झळकू शकतं तुमचं नाव, Co-Branding चा प्रस्ताव मान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Railway Station
आता रेल्वे स्थानकावर झळकू शकते तुमचे नाव

आता रेल्वे स्थानकावर झळकू शकतं तुमचं नाव, Co-Branding चा प्रस्ताव मान्य

पुणे - तुमचे नावे (Name) अथवा तुमच्या कंपनीचा लोगो (Company Logo) पुणे रेल्वे स्थानकांच्या (Pune Railway Station) बोर्डवर (Board) झळकू शकतो. कारण रेल्वे बोर्डाने ‘को ब्रॅंडिंग’च्या (Co Branding) यादीत या स्थानकाचा समावेश केला आहे. त्यामुळे जे आपले नाव अथवा कंपनीचा लोगो स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील बोर्डवर झळकवून ब्रॅण्डिंग करू इच्छितात, त्यांना ते शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी ठरावीक रक्कम मोजावी लागणार आहे.

‘नॉन फेयर रेव्हेन्यू’अंतर्गत रेल्वेने पुणे विभागातील चार रेल्वे स्थानकाचा ‘को ब्रॅंडिंग’च्या यादीत समावेश केला आहे. यात पुणे, मिरज यांच्यासह अन्य दोन स्थानकाचा समावेश आहे.

पुणे विभागातील चार स्थानकांचा यात समावेश करण्यात आला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ‘को-ब्रॅंडिंग’मुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

शब्दमर्यादेची अट

  • पुणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर, स्थानकाच्या इमारतीवर, फलाटावरील सायनेज बोर्डवर, तसेच ज्या ज्या ठिकाणी पुणे असे लिहिले आहे, अशा सर्व ठिकाणी इच्छुकांना नाव झळकाविता येणार आहे.

  • याची एक ते तीन वर्षे कालमर्यादा असणार आहे. मात्र, यासाठी शब्दमर्यादेची अट रेल्वेने घातली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62415 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top