
पत्ता बदलण्याच्या बहाण्याने लष्करातील अधिकाऱ्याला गंडा
पुणे, ता. ११ : ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू घरी पोचविण्यासाठी पत्ता अपडेट करावा लागेल, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने लष्करातील एका अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कॅम्प परिसरात घडली.
या प्रकरणी प्रमोदकुमार सिंग (वय ४३, रा. कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे लष्करात अधिकारी आहेत. एका व्यक्तीने सिंग यांना फोन करून तुम्ही ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू घरी पोचवतो. परंतु त्यासाठी घराचा पत्ता अपडेट करावा लागेल, असा बहाणा करून मोबाईलवर ‘एनीडेस्क रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर’ ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. ॲप्लिकेशन डाऊनलोड करताच आयडी मागितला. फिर्यादी सिंग यांनी तो आयडी दिल्यानंतर कुरिअरमधून फोन केलेल्या व्यक्तीने सिंग यांच्या खात्यातून १२ हजार रुपये परस्पर काढून घेतले. बॅंक खात्यातून पैसे गेल्याचे समजताच सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62417 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..