बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे नवीन डिजिटल उत्पादने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 
नवीन डिजिटल उत्पादने
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे नवीन डिजिटल उत्पादने

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे नवीन डिजिटल उत्पादने

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने महाबँक लीड्स, डिजिटल महाबँक किसान क्रेडीट कार्ड, व्हर्च्युअल विझिटिंग कार्ड आदी डिजीटल सेवांचे नुकतेच उद्‍घाटन करण्यात आले.
‘‘आमच्या कल्पना आणि प्रयत्न हे बँकेच्या डिजिटल सेवा मजबूत करण्यासाठी व त्यायोगे बँकेचा ग्राहक आधार विस्तारण्याचा प्रयत्न आहे,’’ असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी ‘स्वोट’ बैठकीत सांगितले. देशातील सर्वांत कार्यक्षम अशा पहिल्या तीन बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र असावी असे वाटत असल्यास डिजिटल सेवांचा उपयोग करूनच हे साध्य करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
वाढत्या प्रमाणातील डिजिटल व्यवसाय अधिकाधिक बँकेकडे खेचून बँकेचा डिजिटल प्रवास अधिक सुरळीत झाल्यास बँकेला एक मजबूत डिजीटल कार्यप्रणाली निर्माण करून आपल्या व्यवसायाला अधिक उंचीवर नेण्यास हातभार लागेल, असे बँकेचे कार्यकारी संचालक ए. बी. विजय कुमार यांनी सांगितले.
बँकेने २०२२-२३ हे डिजीटल वर्ष म्हणून घोषित केल्याचे बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी सांगितले. बॅंक अनेक डिजिटल सेवा सुरू करण्यासाठी बँक वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजीटल महाबँक किसान क्रेडिट कार्ड हे बँकेकडून वेळेवारी व पर्याप्त कर्ज सुविधा देऊ करण्यासाठी आहे. व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्डमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना आपले व्हिजिटींग कार्ड आपल्या मोबाईलमध्ये ठेऊन ते सोशल मीडियाद्वारे कोणालाही पाठवता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62424 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top