दोन देशांतील विद्यार्थ्यांची जुळली मने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन देशांतील विद्यार्थ्यांची जुळली मने
दोन देशांतील विद्यार्थ्यांची जुळली मने

दोन देशांतील विद्यार्थ्यांची जुळली मने

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः आचार्य श्री विजय वल्लभ शाळेने कोरोनाकाळामध्ये ब्राझील, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि केनिया या देशाबरोबर व्हर्च्युअल एक्स्चेंज उपक्रमात भाग घेतला होता. नुकतेच फिलिपाईन्स येथील ऊनिडा ख्रिश्चन स्कूल या संस्थेबरोबर ‘व्हर्च्युअल एक्स्चेंज’ हा उपक्रम पार पडला.

इंडो फिलिपाईन्स व्हर्च्युअल एज्युकेशनल एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत इयत्ता सातवी ते आठवीचे विद्यार्थी यात सहभागी झाले. आभासी पद्धतीने तीन महिने दर शनिवारी हा उपक्रम झाला. दोन देशातील ३५ विद्यार्थ्यांमधील संवादाचा पूल या द्वारे बांधला गेला. उपक्रमाचा शेवट प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने झाला. शाळेचे अध्यक्ष सुभाष परमार यांच्यासह फिलिपाईन्सच्या ऊनिडा ख्रिश्चन स्कूलचे प्रशासक बिशप एडगार्डो मारक्वेझ, मुख्याध्यापिका जोसेलिन दिमाला, अमेरिकेच्या पॉझिटिव्ह डिसिप्लीन असोसिएशनच्या योगी पटेल, दक्षिण कोरियामधून शिक्षक सेंगवांन किम, इंग्लंडमधून ग्लोबल स्कूल अलायन्सच्या टोनी कॅमील्लेरी आणि क्लासिमाईस इन्स्टिट्यूटच्या हेरा सकिब आदींचा यात सहभाग होता. उपक्रमाच्या समन्वयक प्रगती जोशी यांनी प्रास्ताविक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी मारुलकर यांनी शाळेच्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62450 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top