शाश्वत विकासासाठी जगाने एकत्र यावे भूतानचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो यांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाश्वत विकासासाठी जगाने एकत्र यावे 
भूतानचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो यांचे मत
शाश्वत विकासासाठी जगाने एकत्र यावे भूतानचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो यांचे मत

शाश्वत विकासासाठी जगाने एकत्र यावे भूतानचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो यांचे मत

sakal_logo
By

पुणे, ता.११ : ‘‘हवामान बदल या आव्हानाला जागतिक प्रतिसादाची गरज आहे. तसेच आता शाश्वत विकासाची आवश्यकता असून, तो कसा होईल यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवे. यासाठी जगाने एकत्र येत मार्ग काढायला हवा,’’ असे मत ‘युरोपियन युनियन’चे आणि भूतानचे भारतातील राजदूत उगो अस्तुतो यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे बुधवारी युरोपियन युनियन स्थापना दिवसाचे औचित्य साधून एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी ‘ईयू आणि भारत ग्रीन, डिजिटल आणि रेसिलेंट फ्युचर’ या विषयावर अस्तुतो यांनी आपले विचार मांडले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, युरोपियन युनियनचे भारतातील शिष्टमंडळाच्या आर्थिक व्यवहार प्रमुख आणि व्यापार समुपदेशक रेनिता भास्कर, तसेच टीम लीडर प्रकाश नायक आणि उच्च शिक्षणतज्ज्ञ संजीव रॉय आदी उपस्थित होते.
अस्तुतो यांनी कोरोनानंतरच्या डिजिटल संक्रमणाचा पाया दर्जेदार पायाभूत सुविधांवर हवा, असे मत मांडले. ते म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानातील नावीन्य हे महत्त्वाचे आहे. परंतु त्याचवेळी कॉर्पोरेट कंपन्यांकडून ठेवले जाणारे नियंत्रण हाही मुद्दा येथे महत्त्वाचा आहे. यासाठी वैश्विक दृष्टिकोन ठेवत त्यावर काम व्हायला हवे.’’ युरोपियन युनियनच्या इरास्मस प्रकल्पांतर्गत सुमारे सहा हजार भारतीय विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62466 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top