राज्य लोकसेवा परीक्षा २१ ऑगस्‍ट रोजी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य लोकसेवा परीक्षा 
२१ ऑगस्‍ट रोजी होणार
राज्य लोकसेवा परीक्षा २१ ऑगस्‍ट रोजी होणार

राज्य लोकसेवा परीक्षा २१ ऑगस्‍ट रोजी होणार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा परीक्षा २०२२ ची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागातील गट ‘अ’ तसेच गट ‘ब’ संवर्गातील एकूण १६१ पदांच्या भरती केली जाणार आहे. या परीक्षेची पूर्व परीक्षा २१ ऑगस्ट रोजी एकूण ३७ जिल्हा केंद्रावर घेतली जाणार आहे.
एमपीएससीने वेळापत्रकात जाहीर केल्यानुसार या परीक्षेची जाहिरात एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. त्यामुळे या परीक्षेच्या जाहिरातीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी १२ मे १ जून या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
एकूण आठ पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. जाहिरातील गट ‘अ’ ५९, तर गट ‘ब’ साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या परीक्षेची जाहिरात वेळापत्राकानुसार एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झाली असती, तर १९ जून रोजी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबर महिन्यात झाली असती. मात्र, ही परीक्षा तब्बल दोन महिने पुढे गेली आहे. असे असले तर पदांच्या जाहिराती वेळापत्रकानुसार घ्याव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62470 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top