
‘सारस्वत आंत्रप्रेन्युअर्स’तर्फे उद्योजकांशी संवाद
पुणे, ता. ११ : ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत आंत्रप्रेन्युअर्सने (जीसीएसई) खाद्य क्षेत्रातील (फूड इंडस्ट्री) दोन नामांकित कंपन्यांशी संवादसत्र आयोजित केले होते. हे सत्र येथील द सिनेट बिझनेस सेंटरमध्ये नुकतेच झाले.
जीसीएसई हा सारस्वत समुदायाच्या पुढाकाराने सुरू झालेला उपक्रम आहे. नामांकित उद्योजक व साताऱ्यातील पालेकर फूड प्रॉडक्ट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलकंठ पालेकर, तसेच मुंबईतील सरोज स्वीट्सच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा मराठे यांची मुलाखत रूपा कानविंदे यांनी घेतली. यावेळी त्यांनी पॅकेज्ड फूड इंडस्ट्री, किरकोळ व्यवसायाविषयीची माहिती दिली.
‘‘माझ्या आजोबांनी ८० वर्षांपूर्वी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आजही व्यवसायाला फायदा होतो. ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार उत्पादने देण्यावर आमचा भर असून व्यवसाय प्रक्रियांमध्ये सातत्याने होत असलेल्या सुधारणांमुळे उत्पादनाची कार्यक्षमता वाढली. त्यामुळे या महागाईच्या जगात उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवणे शक्य झाले,’’ असे मत पालेकर यांनी व्यक्त केले. व्यवसायातील स्वच्छता आणि गुणवत्तेबाबत कायम सजग असल्यामुले ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरल्याचे मत मनीषा मराठे यांनी नोंदवले. व्यवसाय करताना मनुष्यबळ व्यवस्थापन धोरण आणि व्यवसायाचा कर्मचाऱ्यांचे महत्त्वही प्रमुख पाहुण्यांनी अधोरेखित केले.
सीए अमित घोलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संगीता कामथ यांनी आभार मानले. याशिवाय पुष्कर कामत, विनीत नेरुरकर यांचाही कार्यक्रमास हातभार लागला. यावेळी ‘जीसीएसई’च्या संचालक मंडळाचे सिद्धार्थ सिनकर आणि गिरीश तेलंग उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62471 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..