‘काव्यशिल्प’तर्फे ‘जाऊ कवीच्या गावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘काव्यशिल्प’तर्फे ‘जाऊ कवीच्या गावा’
‘काव्यशिल्प’तर्फे ‘जाऊ कवीच्या गावा’

‘काव्यशिल्प’तर्फे ‘जाऊ कवीच्या गावा’

sakal_logo
By

पुणे ः ‘कविता ही आनंददायी आणि प्रेरणा देणारी असते. अशी कविता लिहिणारे मोरोपंतांसारखे कवी बारामतीला लाभले, हे बारामतीचे भाग्य आहे’, असे मत बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. ‘काव्यशिल्प’ संस्था व बारामती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कविसंमेलनात त्या बोलत होत्या. ‘काव्यशिल्प’ संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘जाऊ कवीच्या गावा’ या अभिनव उपक्रमांतर्गत बारामती येथील मयूरकवी मोरोपंतांच्या स्मृती स्थळाला संस्थेच्या ३६ कवींनी भेट दिली. या भेटीचे औचित्य साधून कवीसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. यात सुजाता पवार, दीपक करंदीकर, मनोहर सोनवणे, बंडा जोशी, सदानंद करंदीकर, नितीन शेंडे, संजय जाधव, अशोक भांबुरे, ज्योती सरदेसाई, मीनाक्षी नवले, संध्या गोळे, शिवाजी आडे, सीताराम नरके, सचिन हणमघर, विजय सातपुते आदींनी आपल्या बहारदार रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी बारामती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, ‘काव्यशिल्प’चे अध्यक्ष मिलिंद सु. जोशी उपस्थित होते.

अविनाश पाटील यांना ‘प्रतिभा सन्मान’
पुणेः तबला वादक अविनाश पाटील यांना आदर्श फाउंडेशन, इस्लामपूर यांच्यातर्फे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा कलाकारास दिला जाणारा ‘राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२२’ जाहीर झाला आहे. १६ मे रोजी कोल्हापूर शहरात होणाऱ्या कार्यक्रमात विश्वास मेहेंदळे व भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून तबल्याचे पदव्युत्तर शिक्षण सुवर्णपदक पटकावत पूर्ण केले आहे. त्यांनी आजवर सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह देशभरातील विविध मानाच्या संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे.

पं. यादवराज फड यांचा सत्कार
पुणे ः गीताभवन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. यादवराज फड यांचा षष्ठ्यब्दीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष बाबूराव केंद्रे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मृदंग वादक ज्ञानोबा लटपटे महाराज, तुकाराम महाराज शास्त्री आदी उपस्थित होते. यावेळी लटपटे महाराज यांनी ‘कसलीही पार्श्वभूमी नसताना अत्यंत खडतर प्रवास करून पं. फड यांनी संगीत कलेत प्रावीण्य मिळविले. त्याचेच फलित म्हणून आज ते प्रतिथयश गायक आहेत’, असे मत व्यक्त केले. सत्कारापूर्वी पं. यादवराज फड यांची बहारदार मैफिल सादर झाली. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील आणि संवादनीवर माधव लिमये यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ केंद्रे यांनी केले. भाऊराजे केंद्रे यांनी आभार मानले.

दहा वर्षीय सारा तांबोळीचा विक्रम
पुणे ः पिरंगुट येथील सारा सलिल तांबोळी हिने वयाच्या दहाव्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग, तारकर्ली येथून आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल ओपन वॉटर डायवरमध्ये प्रशिक्षण घेऊन समुद्रात संचार केला आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवले आहे. यांमुळे तिचा पुण्यातील सर्वात लहान आणि देशातील पहिल्या पाच सर्वात लहान प्रोफेशनल ओपन वॉटर डायवरमध्ये समावेश झाले आहे. सध्या सारा भुकूम येथील संस्कृती शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिकते आहे.

धनंजय सोलंकर ‘सूर्योदय काव्यभूषण’
पुणे ः सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अखिल भारतीय सूर्योदय साहित्य संमेलन कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच जळगाव येथे पार पडले. या संमेलनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झालेल्या पुरस्कार वितरणात कवी धनंजय सोलंकर यांना राज्यस्तरीय ‘सूर्योदय काव्यभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप होते. धनंजय सोलंकर यांनी आजवर पाच कवितासंग्रह, विविध ध्वनिमुद्रिका व ललित लेखन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62480 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top