म्हाळुंगे-माण टीपी स्किममधील शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळुंगे-माण टीपी स्किममधील
शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
म्हाळुंगे-माण टीपी स्किममधील शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

म्हाळुंगे-माण टीपी स्किममधील शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सुमारे अडीचशे हेक्‍टरवरील म्हाळुंगे-माण टीपी स्कीममधील शेतकऱ्यांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात १५० प्रॉपर्टी कार्डचे जाहीर वाचन करून त्याच्या कच्च्या प्रतींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. त्यामुळे तेथील रहिवाशांना कायदेशीर मालक्की हक्काचा पुरावा मिळण्यातील अडथळा दूर झाला आहे.
पीएमआरडीएकडून म्हाळुंगे माण हाय टेक सिटी प्रारूप नगर योजनेस स्पटेबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर या योजनेवर नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या. दाखल झालेल्या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारकडून लवाद नेमले होते. त्यांनी संबंधित जमिनीच्या मालकांची संवाद साधून ही योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर केली होती. सरकारकडून या योजनेला १२ डिसेंबर २०१९ रोजी अंतिम मान्यता दिली. त्यामुळे ही योजना राबविण्यातील सर्व अडथळे दूर झाले.
राज्य सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्यामुळे आता पुढील टप्पा हा या योजनेतील खातेदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम प्राधिकरणाने हाती घेतले होते. ते आता पूर्णत्वास येत आहे.
प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी या टीपी स्कीमचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून त्याचे चावडी वाचन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी म्हाळुंगे येथे प्रॉपर्टी कार्ड वाचन केले व त्याचे वाटप केले. दरम्यान या प्रॉपर्टी कार्डमध्ये काही त्रुटी किंवा चुका असल्यास त्या तपासून शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात याची माहिती प्राधिकरणास अथवा भूमि अभिलेख विभागास कळवावी, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62514 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top