निवृत्त सेवकांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त सेवकांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू नाही
निवृत्त सेवकांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू नाही

निवृत्त सेवकांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू नाही

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : पगार लेखनिकांकडून वेतननिश्‍चिती होत नसल्यामुळे महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोगाचा फायदा मिळाला नसल्याचे समोर आले आहे. या महिन्याअखेर वेतननिश्चिती करून पेन्शन प्रकरणे त्वरित सादर करावीत; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यानंतर महिन्याभरात सेवानिवृत्त सेवकांनाही तो लागू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच महिने होत असले. तरी देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार पेन्शन निश्‍चित करण्याचे काम पूर्ण झाले नाही. याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी वारंवार पगार लेखनिक यांना कळवूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात पुणे मनपा कामगार युनियनकडून देखील तक्रार करण्यात आली आहे. त्यांची दखल घेऊन या महिन्याभरात सातवा वेतन आयोगानुसार सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांची पेन्शन निश्‍चिती करावी प्रकरणे लेखा व वित्त कार्यालयात पाठवावीत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. या इशारनंतरही पगार लेखनिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणार का, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62517 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top