खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या
पोलिस कोठडीत वाढ
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : वडिलोपार्जित जमीन आणि रोजच्या भांडणातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांच्या पोलिस कोठडीत १४ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. चेतन ऊर्फ पांड्या रोहिदास फाळके (वय २९), अमित ऊर्फ गुंड्या चंद्रकांत फाळके (वय ३०, दोघेही रा. भूगाव) आणि रमेश ऊर्फ भगवान सुकाळे (वय २९, रा. बावधन) यांना अटक करण्यात आली आहे. प्रीतम राजेंद्र फाळके (वय २५, रा स्वॉगबर्ड सोसायटी, भूगाव) यांचा पाच मे रोजी खून करण्यात आला होता. या प्रकरणी ऋतुराज हृदयनाथ जाधव (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62523 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top