बाल-कुमार शब्दोत्सवात गावस्कर यांचे कथाकथन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल-कुमार शब्दोत्सवात गावस्कर यांचे कथाकथन
बाल-कुमार शब्दोत्सवात गावस्कर यांचे कथाकथन

बाल-कुमार शब्दोत्सवात गावस्कर यांचे कथाकथन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः ‘अस्वलाच्या केसात झाल्या उवा उवा, काढायच्या कशा सांगा बुवा’, ‘विदुषका विदुषका’ अशी मजेशीर गाणी, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील गोष्टी, सत्यजित रे यांना बालपणी मिळालेला गुरू देवांचा सहवास आदी गोष्टी ऐकताना बाल-कुमार हरखून गेली.

निमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित बाल-कुमार शब्दोत्सवांतर्गत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या कथाकथन कार्यक्रमाचे. याप्रसंगी अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर, शिवानी राठिवडेकर उपस्थित होते. अक्षरधारा बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज वाचक कट्ट्यावर झालेल्या या कार्यक्रमात रेणू गावसकर यांनी मुलांसह पालकांबरोबर संवाद साधला. ‘मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायचा असेल तर मुलांचे ऐकायला शिका’, असा सल्ला गावस्कर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62531 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top