बालगंधर्व पुनर्विकासाबाबत व्यापक चर्चा का नाही ः आप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालगंधर्व पुनर्विकासाबाबत व्यापक चर्चा का नाही ः आप
बालगंधर्व पुनर्विकासाबाबत व्यापक चर्चा का नाही ः आप

बालगंधर्व पुनर्विकासाबाबत व्यापक चर्चा का नाही ः आप

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : बालगंधर्व पुनर्विकास प्रकल्पाची रक्कम १० कोटींवरून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढत असताना नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, नगरसेवक यांच्या सोबत व्यापक चर्चा का केली नाही, असा सवाल आम आदमी पक्षातर्फे बुधवारी उपस्थित करण्यात आला.

बालगंधर्व पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचा दावा पुणे महानगरपालिका करत असल्याने संबंधित कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पक्षातर्फे करण्यात आली.
पुणेकरांचे वैभव असलेले बालगंधर्व रंगमंदिर येथे पुनर्विकासाच्या नावाखाली नवीन इमारत उभ्या करण्याच्या चर्चा केल्याचा दावा पुणे महानगरपालिका करत आहे त्या कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, २०१८ साली १० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या प्रकल्पाची रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत कशी काय वाढली? याबाबत वरील कलाकारांना कल्पना दिली गेली होती का ? सध्याची १४ नाट्यगृहे नीट चालविण्याबाबत तरतूद करण्याऐवजी एकाच प्रकल्पावर १०० कोटी रुपये खर्च करणे कितपत उचित आहे, असे प्रश्न पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62532 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top