मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन
मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन

मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः ‘‘अनेक वर्षांपासून पोवाडयातून समाजप्रबोधनाचे काम सुरू आहे. शाहीर आपल्या पोवाडयातून जे सांगतात, ते त्यांनी अनुभवायला हवे. पोवाडा सादर करताना दृश्यकलेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे’’, असे मत कथक नृत्यांगना पं. मनिषा साठे यांनी व्यक्त केले.
‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे’ व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे आयोजित मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ब्रिगेडियर (निवृत्त) प्रसाद जोशी, डी. ई. सोसायटीचे डॉ. शरद आगरखेडकर, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते. यंदा पोवाडा वर्गामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत असून आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे सलग २५ वर्षे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62544 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top