...म्हणून कुलगुरू राहतात ट्वीटरपासून लांब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून कुलगुरू राहतात ट्वीटरपासून लांब
...म्हणून कुलगुरू राहतात ट्वीटरपासून लांब

...म्हणून कुलगुरू राहतात ट्वीटरपासून लांब

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः ‘विद्यापीठाचे कुलगुरू ट्विटरसारख्या समाजमाध्यमावर असायला हवेत, असे लोक म्हणतात. पण जेव्हा मी ट्विटर वापरेन, तेव्हा त्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रियेला प्रतिसाद देणे ही माझी जबाबदारी आहे आणि कुलगुरू म्हणून मी हे दिवसभर करू शकत नाही. यामुळे अशा माध्यमांपासून मी लांब राहतो,’ असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात आयोजित ‘फंडामेंटल्स ऑफ डिजिटल जर्नलिजम’ या पुस्तकाचे डॉ. करमळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विश्वकर्मा प्रकाशन तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर, डॉ. योगेश जोशी आणि डॉ. मकरंद पंडित, डॉ. संजय तांबट आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार असल्याने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

विद्यापीठाचे १३० सामंजस्य करार

‘शिक्षणपद्धतीमध्ये तातडीने बदल करण्याची गरज असून चॉइस बेस्ड क्रेडीट पद्धती आणि लिबरल शिक्षण यावर शिक्षण पद्धती अवलंबून असायला हवी. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये यावरच भर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मी सातत्याने नवीन शिक्षणपद्धती अवलंबण्याचा प्रयत्न केला. उद्योग, संस्था यांना विद्यापीठाशी जोडण्यासाठी जवळपास १३० हून अधिक सामंजस्य करार केले. यामुळे विद्यापीठाच्या बाहेर काय घडते आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल’, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

विद्यापीठामध्ये काही विभागांमध्ये परस्पर संवादाचा अभाव आहे. काही ठिकाणी तर एकाच विभागात संवाद होताना दिसत नाही. हा विसंवाद टळला तर येणाऱ्या काळात विद्यापीठात खऱ्या अर्थाने लिबरल शिक्षण दिले जाईल- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

PNE22S63794

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62562 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top