
चालकाच्या चुकीमुळे ‘त्या’ एसटीचा अपघात आरटीओच्या अहवालात कारणांचा उलगडा; २८ एप्रिलला शंकर महाराज उड्डाणपुलावर झाला होता अपघात
पुणे, ता. ११ : सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर एसटीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर सहा ते सात जण जखमी झाल्याची घटना २८ एप्रिलला घडली होती. यावेळी एसटी चालकाने हा अपघात ब्रेक फेल झाल्याने सांगितले. मात्र, आरटीओच्या तपासणीत वाहनांत कोणतेही दोष आढळले नाहीत. तसा अहवालच आरटीओने पोलिसांना व एसटी प्रशासनाला दिला आहे. यात एसटी चालकाच्या चुकीने अपघात झाले असल्याचे म्हटले आहे. पुणे एसटी विभागाला तो अहवाल प्राप्त झाला असून पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल सातारा विभागाकडे पाठवून दिला आहे.
सातारा-पुणे (स्वारगेट) ही एसटी शंकर महाराज उड्डाणपुलावर येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाला होता. यात एकाचा मृत्यू देखील झाला होता. घटनेच्या चौकशीचे आदेश पुणे विभागाने दिले होते. त्यानुसार आरटीओ विभागाने बसची तपासणी केली. बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष आढळून आला नाही. त्यामुळे चालकाच्या चुकीनेच हा अपघात झाल्याचे एसटी व पोलिसांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. घटनेच्या दिवशी पुणे विभागाच्या यांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन एसटीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी देखील चालकाच्या चुकीचेच अपघात झाले असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले होते.
कोट
अपघातग्रस्त एसटीचा अहवाल आरटीओ कडून प्राप्त झाला. यात चालकाच्या चुकीनेच अपघात झाल्याचे म्हटले आहे. ही बस व चालक सातारा विभागाचा असल्याने आरटीओचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सातारा विभागाकडे पाठवून दिला आहे.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62566 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..