वीजमिटरच्या उपलब्धतेबाबतचे दावे फोल ः वेलणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजमिटरच्या उपलब्धतेबाबतचे दावे फोल ः वेलणकर
वीजमिटरच्या उपलब्धतेबाबतचे दावे फोल ः वेलणकर

वीजमिटरच्या उपलब्धतेबाबतचे दावे फोल ः वेलणकर

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : मीटरचा तुटवडा दूर होणार, एवढे लाख मिटर उपलब्ध होणार, असे दावे एकीकडे महावितरणकडून केले जात असताना, दुसरीकडे मात्र ग्राहकांना पैसे भरूनही नवीन वीजमीटर अथवा नादुरूस्त मिटर महिनोमहिने बदलून मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीज मीटरर्सचा हा दुष्काळ कधी संपणार, असा सवाल सजग नागरिक मंचाने व्यवस्थापकीय संचालकांना पत्राद्वारे केला आहे.

गेली दहा वर्षे महावितरणकडे वीज मीटर्सचा दुष्काळ आहे. हा दुष्काळ फक्त थ्री फेज मीटर्सचाच नाही तर घरगुती सिंगल फेज मीटर्सही उपलब्ध नसतात. यावरून ओरड निर्माण झाली की थोडा काळ मीटर्स उपलब्ध होतात. नवीन वीजजोडसाठी मीटर्स उपलब्ध तर होत नाहीच. परंतु नादुरुस्त मीटर्स बदलण्यासाठी सुद्धा मीटर्स उपलब्ध नसतात, मग कायदा धाब्यावर बसवून ग्राहकांना सरासरी बिले दिली जातात. राज्यात महावितरण कंपनीला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या पुणे परिमंडळातसुद्धा मीटर्सचा तुटवडा असेल तर उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांची परिस्थिती यापेक्षा वाईट असण्याची शक्यता आहे, असेही मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62614 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top