हिंदू एकता दिंडीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू एकता दिंडीचे आयोजन
हिंदू एकता दिंडीचे आयोजन

हिंदू एकता दिंडीचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू जनजागृती समितीचे डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८०व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने देशात हिंदू राष्ट्र-जागृती अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात हिंदू एकता दिंडीचे आयोजन केले आहे. ही दिंडी येत्या रविवारी (ता. १५) सायंकाळी सव्वा पाच वाजता बाजीराव रस्ता येथील महाराणा प्रताप उद्यान येथून सुरू होणार आहे. त्यानंतर बाजीराव रस्ता मार्गे लक्ष्मी रस्ता-अलका टॉकीज चौक-स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक करत डेक्कन येथे दिंडीची सांगता होईल, अशी माहिती संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, समितीच्या क्रांती पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62633 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top