‘केंद्र, राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘केंद्र, राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल’
‘केंद्र, राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल’

‘केंद्र, राज्य सरकारद्वारे ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल’

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात नेहमीच चालढकल केली जात असून आज ओबीसी आरक्षण मिळाले नाही. राज्यात ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्ष लढा देणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी काळात राज्यातील स्थानिक स्‍वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकीत ५२ टक्के ओबीसी समाजाला उमेदवारी देणार असल्याचे यावेळी शेवते यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष पुणे व पिंपरी चिंचवड कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदावर ॲड संजय माने, जिल्हाध्यक्ष पदी विनायक रूपनवर, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, महिला आघाडी शहर अध्यक्ष म्हणून सुनीता किरवे यांना नियुक्ती पत्र दिले. वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विजय लेंगरे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शरद दडस, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष परमेश्र्वर बुर्ले आदींना पत्र प्रदान करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62719 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top