
पुणे विमानतळावरील तपासण्या होणार जलद
पुणे - सुरक्षेच्या (Security) कारणास्तव प्रवाशांना (Passenger) पुणे विमानतळावर (Pune Airport) रांगा लावाव्या लागणार नाही. कारण नव्या टर्मिनलमध्ये दोन अत्याधुनिक प्रणालीचा (Sophisticated System) वापर केला जाईल. यात ऑटोमॅटिक ट्रे रिट्रीव्हल सिस्टिम (ATRS) व इनलाइन बॅगेज स्क्रिनिंग सिस्टीम यांचा समावेश आहे. सुमारे २० कोटी रुपयांच्या या प्रणालीमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. शिवाय मानवी हस्तक्षेप राहणार नाही. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. यामुळे सध्याच्या तुलनेत ४० टक्क्यांहून अधिक प्रवाशांना हाताळता येणार आहे. मात्र, यासाठी प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.
का घेतला निर्णय?
- पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम वेगाने सुरू
- या कामाला आणखी गती येणासाठी टर्मिनल सरव्यवस्थापकांचा नियुक्ती
- डिसेंबर २०२२ अखेर टर्मिनल सुरू होईल असे उद्धिष्ट
- त्याच्या आधी काम व्हावे यासाठी आता प्रयत्न सुरू
- प्रवाशांना आपल्या सामानांची तपासण्या करण्यासाठी अधिक वेळ लागू नये यासाठीच ऑटोमॅटिक ट्रे रिट्रीव्हल सिस्टिम (ATRS) बसविले जाणार
- प्रवासी सेक्युरिटी पॉइंटवर आल्यावर त्याची व त्याच्या सामानांची एकाच वेळी तपासणी होणार
- ट्रे रिट्रीव्हल सिस्टिम ही एक रोलरवर आधारित सेटअप
- यात प्रवासी आपले साहित्य ठेऊन दिल्यावर अवघ्या काही मिनिटांत त्याची तपासणी होईल
- सध्या ‘सीआयएसएफ’चे जवान सामानांची अथवा ट्रेमधील साहित्याची पाहणी करतात
सध्या हे काम कसे चालते?
- प्रवासी आपल्या बॅग व इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी ट्रे वेगळे करण्यात येते
- वस्तू ट्रेमध्ये टाकल्यानंतर तो ट्रे स्कॅनर मशिनमध्ये ठेवण्यात येते
- स्कॅनर मशिनमधून प्रवाशांनी आपल्या बॅग व ट्रे घेऊन जायचे असते
- मात्र इथे प्रवाशांची गर्दी असते
- अन्य प्रवाशांना ट्रे मिळण्यासाठी सीआयएसएफ कर्मचारी स्वतः ते ट्रे गोळा करतात जेणेकरून ते पुन्हा वापरता येतील
- हे ट्रे आणण्यात अनेकदा उशीर होतो
आता काय होईल?
- ऑटोमॅटिक ट्रे रिट्रीव्हल सिस्टिममध्ये दोन स्तर असतील
- वरच्या भागात रोलर असतील
- त्यावर ट्रे ठेवल्यावर अवघ्या काही सेकंदात स्क्रिनींग होईल
- स्क्रिनिंग झाल्यावर प्रवाशांनी ट्रेमधून आपले साहित्य घ्यावे
- त्यानंतर रोलरच्या खालच्या भागात देखील रिकामे ट्रे ठेवण्याची सोय
- ते ऑटोमॅटिक पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी पोहचेल
- यामुळे ट्रेसाठी शोधाशोध अथवा रांगा लागणार नाहीत
- यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल
- ट्रेमध्ये रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टॅग असतील
- ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सतत देखरेखीखाली असतील
नव्या टर्मिनलसचे काम वेगाने सुरू आहे. प्रवासी सुविधेत वाढ करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी ऑटोमॅटिक ट्रे रिट्रीव्हल सिस्टिम व बॅगेजचे स्क्रीनिंग लवकर होण्यासाठी नवीन प्रणाली बसविण्यात येत आहे.
- गगन मलिक, सरव्यवस्थापक, पुणे टर्मिनल्स, पुणे विमानतळ
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62776 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..