
स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा पुणेकरांपुढे मांडावा ः जोशी
पुणे, ता. १२ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पुण्यात करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी आणि संपूर्ण योजनेचा पंचनामा करून पुणेकरांपुढे मांडावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशनद्वारे (जेएनएनयूआरएम) पुणे शहरात १ हजार ५०० कोटींची विकासकामे झाली. मनमोहन सिंग सरकारची ही उपयुक्त योजना बंद पाडून मोदी सरकारने स्मार्ट सिटी योजना आणली. पंतप्रधान मोदी यांनी मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटी योजनेचे उदघाटन पुण्यात केले. स्मार्ट सिटी योजनेचा पहिला टप्पाही पुण्यात यशस्वी झालेला नाही. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी पुणे महापालिका आणि खासदार निधीचा वापर झाला आहे. त्याचा विनियोग आणि झालेल्या कामांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62777 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..