
अक्षरधाराच्या ‘शब्दोत्सवात’ रंगले रेणू गावस्कर यांचे कथाकथन
पुणे, ता. १२ ः ‘‘अस्वलाच्या केसात झाल्या उवा उवा, काढायच्या कशा सांगा बुवा’’, ‘‘विदुषका विदुषका’’ अशी गंमतगाणी, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधील गोष्टी, पटकथालेखक आणि दिग्दर्शक सत्यजित राय यांना बालपणी मिळालेला गुरू देवांचा सहवास, सत्यजित राय ऊर्फ माणिक आणि त्यांची बहिण विजया यांच्या बालपणीच्या गंमतीजंमती ऐकताना बाल-कुमार हरखून गेली.
निमित्त होते, अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित बाल-कुमार शब्दोत्सवांतर्गत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या संस्कारक्षम गोष्टींच्या कथाकथन कार्यक्रमाचे. यावेळी अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठीवडेकर, रसिका राठीवडेकर, शिवानी राठीवडेकर उपस्थित होते. यावेळी गावसकर यांनी मुलांसह पालकांबरोबर संवाद साधला.
गावसकर म्हणाल्या की, ‘‘पालक म्हणून मुलांची जडणघडण करताना मुलांवर विनाअट प्रेम आणि स्वीकार हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर मुलांची तुलना करू नका. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायचा असेल तर मुलांचे ऐकायला शिका.’’ प्रास्ताविक अक्षरधाराच्या संचालिका रसिका यांनी प्रास्ताविक केले. शिवानी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62789 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..