मेघमाला वाघमारे यांना फ्लोरेन्स नाईट ट्विंकल पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेघमाला वाघमारे यांना फ्लोरेन्स नाईट ट्विंकल पुरस्कार
मेघमाला वाघमारे यांना फ्लोरेन्स नाईट ट्विंकल पुरस्कार

मेघमाला वाघमारे यांना फ्लोरेन्स नाईट ट्विंकल पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे फ्लोरेन्स नाईट ट्विंकल पुरस्कार मेघमाला वाघमारे या परिचारिकेला खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक कृष्णकुमार गोयल, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, दुर्योधन भापकर, शरद जाधव, अनिल भिसे, इंद्रजित भालेराव, अँड रमेश पवळे, प्रशांत टेके आदी उपस्थित होते.
समितीतर्फे कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या ५१ परिचारिकांचा गौरव केला. प्रा. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र भुतडा यांनी प्रास्ताविक तर अनिल भिसे यांनी आभार मानले. विशाल जाधव, अमोल जाधव, चेतन भुतडा, विक्की जेठीथोर, अनिकेत भिसे यांनी परिश्रम घेतले. चव्हाण म्हणाल्या की, ‘‘गेल्या दोन वर्षात परिचारिकांनी जे लोकसेवाचे काम केले आहे. याची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. दोन वर्षानंतर मनुष्याला थोडाफार निवांत पण आलेला आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62802 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top