कृष्ण प्रकाश यांच्याबाबतच्या ‘त्या’ व्हायरल पत्राची गृह सचिवांमार्फत होणार चौकशी अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्ण प्रकाश यांच्याबाबतच्या ‘त्या’ व्हायरल पत्राची गृह सचिवांमार्फत होणार चौकशी
अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा
कृष्ण प्रकाश यांच्याबाबतच्या ‘त्या’ व्हायरल पत्राची गृह सचिवांमार्फत होणार चौकशी अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा

कृष्ण प्रकाश यांच्याबाबतच्या ‘त्या’ व्हायरल पत्राची गृह सचिवांमार्फत होणार चौकशी अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात व्हायरल झालेल्या पत्राची चौकशी राज्याच्या गृह सचिवांमार्फत होणार आहे, असे शिवसेनेचे पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच ते पत्र माझे नाही असे सांगणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचीही नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना भेटून केल्याचेही सांगितले. याबाबत ‘सकाळ’ने कृष्ण प्रकाश यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘नो कॉमेंटस’ असे उत्तर दिले.

पत्रकार परिषदेस शिवसेनेचे पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, संघटक माधव मुळे, विजय गुप्ता, शहर संघटक सरिता साने, उपसंघटिका शैला पाचपुते, अल्पसंख्याक विभागाचे शहरप्रमुख हाजी दस्तगीर मणियार, विभाग प्रमुख सय्यद पटेल दीपक कांबळे, अनिल पारचा, प्रदीप दळवी आदी उपस्थित होते.

चाबुकस्वार म्हणाले, ‘‘कृष्ण प्रकाश यांच्यासाठी दोनशे कोटी रुपये गोळा केल्याचे, तसेच त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाबाबतचे पत्र आठ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक व कृष्ण प्रकाश यांचे त्यावेळी वाचक असलेले डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने हे पत्र आहे. या पत्रामुळे शहरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये पोलिस खात्याविषयी संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचे पुढे काय होणार? असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाची कोंडी फोडण्यासह झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे नागरिकांसमोर येणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह इतरांना निवेदन दिले आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या पत्राची राज्याच्या गृह सचिवांमार्फत चौकशी होणार आहे. याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62840 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top