अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

शिवरायांची अर्थनीती आवश्यक : रायबा नलावडे
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीतील २५ वर्षे म्हणजे सर्वाधिक काळ अर्थकारण केले. स्वराज्यातील शेतकरी, मजूर, व्यापारी अशा प्रत्येक गरीब घटकाचे कल्याण होईल, अशी अर्थनीती त्यांनी अवलंबली. आजच्या काळात शिवरायांच्या या अर्थनीतीची आत्यंतिक आवश्यकता आहे, असे मत लेखक व शिवचरित्र अभ्यासक राहुल ऊर्फ रायबा नलावडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अमित गायकवाड, बी. एम. शर्मा, अनिल वखारिया, नरेंद्र सोनवणे, मनोज चितळीकर, श्रीपाद बेदरकर, ज्ञानेश्वर नरवडे, स्वप्नील शहा, अमोल शहा आदी उपस्थित होते. प्रणव सेठ यांनी सूत्रसंचालन केले. मनोज चितळीकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीपाद बेदरकर यांनी आभार मानले.

मासिक संविधान कट्टा उपक्रमाचे उद्‍घाटन
पुणे : एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या मासिक संविधान कट्टा या उपक्रमाचे उद्‍घाटन महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. या वेळी फाउंडेशनचे विश्वस्त मनीषा गुप्ते, आनंद थोरात, सुभाष लोमटे आदी उपस्थित होते. संविधान साक्षरतेची चळवळ सुरू व्हावी. घर तेथे संविधान यासाठी प्रयत्न करावेत, असे डॉ. आढाव यांनी सांगितले. इनक्रेडेबल समाजसेवा ग्रुपचे अध्यक्ष अस्लम बागवान व संविधान संवादक शीतल यशोधारा यांनी संविधान साक्षरता अभियानातील अनुभव मांडले. तमन्ना इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. तर उपेंद्र टण्णू, राहुल भोगले, किरण पाटील, संतोष केंगले यांनी नियोजन केले.

‘कात्रज मेट्रो स्टेशनला महाराणा प्रताप यांचे नाव द्या’
पुणे : देशात हिंदू धर्माची पताका फडकवत ठेवण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मोघलांशी लढण्यात खर्ची घातले व आपल्या बुद्धिमत्ता, ताकद व शौर्यामुळे कधीही शत्रुकडून पराभूत न होता आपला धर्म जागृत ठेवला. अशा महान योद्ध्याचे शौर्य या पिढीला व येणाऱ्या पिढीला कळावे. त्यांच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला मिळावी. यासाठी कात्रज येथील मेट्रो स्टेशनला हिंदुकुलभूषण वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव द्यावे, अशी मागणी राजपूत समाज सेवा विकास मंचने केल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62848 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top