
लष्कराच्या कृत्रिम अवयव केंद्राचा स्थापना दिन उत्साहात
पुणे, ता. १२ ः देशाच्या संरक्षणासाठी सेवाकार्य बजावताना दिव्यांग झालेल्या जवानांना कृत्रिम अवयव पुरविणाऱ्या लष्कराच्या कृत्रिम अवयव केंद्राने (एएलसी) सात दशकांची अभिमानास्पद वाटचाल पूर्ण केली आहे. एएलसीचा स्थापना दिन नुकताच उत्साहात पार पडला.
एएलसीद्वारे आतापर्यंत ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत यामध्ये लष्करात कार्यरत जवान, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. त्याचबरोबर सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो तिबेटियन सीमा पोलिस यासारख्या निमलष्करी दलातील आणि नागरी रुग्णांना देखील आवश्यक ते कृत्रिम अवयव आणि उपचार पुरविण्यात आले आहेत. नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश सारख्या मित्र देशांतील रुग्णांना देखील या केंद्राद्वारे सेवा देण्यात आली आहे. एएलसीची स्थापना १९४४ मध्ये झाली. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. हे केंद्र, लष्कराच्या खडकी येथील पॅरालिंपिक क्रीडा विभागाशी देखील जोडलेले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62849 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..