‘सीआयआय’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजीव बजाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीआयआय’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजीव बजाज
‘सीआयआय’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजीव बजाज

‘सीआयआय’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजीव बजाज

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांची २०२२-२३ वर्षासाठी सीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा स्टील लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांच्याकडून बजाज कार्यभार स्किारतील. तर हिरो मोटोकॉर्प लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांची सीआयआयच्या प्रेसिडेंट-डेसिगनेट म्हणून आणि टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. दिनेश यांची सीआयआयच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव बजाज हे सीआयआयसाठी गेली अनेक वर्षे राज्य, क्षेत्रीय व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत राहिले आहेत. ते वर्ष २०१२-२२ करिता प्रेसिडेंट-डेसिगनेट तर २०१९-२० साली पश्‍चिम क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62854 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top