
फेरफार आदालतीत ४ हजार दावे निकाली
पुणे : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या फेरफार अदालतीत एकाच दिवशी ४ हजार ५५२ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या बॅंकचे बोजे, वारसनोंदी तसेच खरेदीच्या नोंदी प्रलंबित होत्या. जिल्ह्यात सर्वाधिक फेरफार बारामती तालुक्यात निकाली काढण्यात आले. बारामतीमध्ये ६६५, दौंडमध्ये ५९७, शिरूरमध्ये ५९१, खेडमध्ये ४६९ आणि आंबेगावमध्ये ४२७ फेरफार निकाली काढण्यात आले आहे. तर हवेलीमध्ये ३६८, पुणे शहरात ९, पिंपरी चिंचवडमध्ये १४८, जुन्नरमध्ये २८१, इंदापूरमध्ये २१५, मावळमध्ये २४५, मुळशीमध्ये ८५, भोरमध्ये १२३, वेल्हा १११ आणि पुरंदरमध्ये २१८ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक, करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून मोहीम स्वरूपात फेरफार अदालतीचे आयोजन मंडल स्तरावर करण्यात आले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62856 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..