पुणेकरांना उन्हाच्या चटक्यापासून दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांना उन्हाच्या चटक्यापासून दिलासा
पुणेकरांना उन्हाच्या चटक्यापासून दिलासा

पुणेकरांना उन्हाच्या चटक्यापासून दिलासा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : उन्हाच्या झळांपासून तापलेल्या पुणेकरांना मागील तीन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळत आहे. शहरात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात झपाट्याने घट झाल्याने आता मे महिना काहीसा सुसह्य जाणवू लागला आहे. पुढील तीन दिवस हे चित्र असेच कायम राहण्याची शक्यता आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मात्र गुरुवारी (ता. १२) कमाल तापमानात सरासरीपेक्षा चक्क ३.५ अंशांनी घट झाली. शहरात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि २५.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले. गुरुवारी शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरणाचे सावट कायम होते. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारपर्यंत (त. १५) पुणे व परिसरात ढगाळ वातावरणाची स्थिती अशीच कायम राहणार असून, कमाल तापमान हे ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान असेल. त्यानंतर मात्र मुख्यतः आकाश निरभ्र राहणार असून, कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस नागरिकांना उन्‍हाच्‍या झळांचा त्रास कमी जाणवणार आहे.

कमाल तापमानात चढ-उतार सुरूच
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘असानी’ चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ हवामानासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. तर राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची हजेरीदेखील लागत आहे. परंतु, राज्यातील उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात व कोकणात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४४.४ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान महाबळेश्र्वर येथे १९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सध्या विदर्भात पारा चाळिशीवर स्थिर असून शनिवारपासून (ता. १४) विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्‍यता आहे. तर शुक्रवारी (ता. १३) कोकणातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62871 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top