अवयवदानाची जबाबदारी रुग्णालय समितीकडेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवयवदानाची जबाबदारी रुग्णालय समितीकडेच
अवयवदानाची जबाबदारी रुग्णालय समितीकडेच

अवयवदानाची जबाबदारी रुग्णालय समितीकडेच

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : जवळच्या नात्यांमधील किंवा स्वॅप प्रकरणांमध्ये अवयव प्रत्यारोपणाला मान्यता देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित रुग्णालयाचीच आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने (डीएमईआर) परिपत्रक काढले आहे. रूबी हॉल क्लिनिकमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणानंतर ‘डीएमईआर’ने हे परित्रपक राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहे.

नात्यांमधील होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाची पडताळणीची सर्वस्व जबाबदारी रुग्णालयाच्या समितीची आहे. ती अवयव प्रत्यारोपणाच्या सरकारी समितीची नाही, असे यात स्पष्ट केले आहे. या बाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘मानवी अवयव आणि पेशी प्रत्यारोपण कायदा २०१४’मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, नात्यांमध्ये होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाबाबत कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाची आहे. वर्षभरामध्ये २५ पेक्षा जास्त अवयव प्रत्यारोपण होणाऱ्या रुग्णालयाला या बाबतची परवानगी देण्यात आली आहे. जवळच्या नातेवाइकाशिवाय अवयवदान करत असलेली इतर व्यक्ती किंवा परदेशी नागरिक तसेच स्वॅप पद्धतीने होणारे अवयव प्रत्यारोपण यासाठीदेखील हा नियम लागू असणार आहे.’’

अवयवांची चोरी किंवा आमिष दाखवून अवयवदान होऊ नये. अवयवदानातील अनिष्ट घटनांना प्रतिबंध व्हावा, हा या कायद्याचा उद्देश आहे. तो उद्देश पूर्ण व्हावा यासाठी नव्याने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62874 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top