मुलीच्या बदनामीप्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या बदनामीप्रकरणी एकास अटक
मुलीच्या बदनामीप्रकरणी एकास अटक

मुलीच्या बदनामीप्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे अश्लील फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेऊन बदनामी केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तरुणाला अटक केली. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी त्याला १६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबत १४ वर्षीय मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०२१ ते १२ मे २०२२ या कालावधीत ही घटना घडली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील त्याने घरी कोणी नसताना तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेऊन तिची बदनामी केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62876 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top