रुग्णालयाने प्राधिकृत समितीची दिशाभूल केली : डॉ. कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयाने प्राधिकृत समितीची दिशाभूल केली : डॉ. कदम
रुग्णालयाने प्राधिकृत समितीची दिशाभूल केली : डॉ. कदम

रुग्णालयाने प्राधिकृत समितीची दिशाभूल केली : डॉ. कदम

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : अवयवदानासाठी अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्ण शहानिशा करण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या समितीवर असते. रूबी हॉल क्लिनिकमधील समितीने ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. त्यामुळे रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी गुरुवारी दिली.

रुग्णालयाने अवयव दानाच्या कागदपत्रांची सखोल खात्री न करता ती फाइल ससून रुग्णालयाच्या प्राधिकृत समितीकडे दिली. त्यातून या सरकारी समितीची दिशाभूल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णालयाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ चे कलम १० चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हा प्रकार रूबी हॉल क्लिनिकमध्ये घडला असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, मूत्रपिंड देणारी महिला आणि ते घेणारा रुग्ण यांच्याविरोधातही फिर्याद दाखल केली असल्याचे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62884 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top