ब्रेकफेलप्रकरणी ‘पीएमपी’चे तीन कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकफेलप्रकरणी ‘पीएमपी’चे तीन कर्मचारी निलंबित
ब्रेकफेलप्रकरणी ‘पीएमपी’चे तीन कर्मचारी निलंबित

ब्रेकफेलप्रकरणी ‘पीएमपी’चे तीन कर्मचारी निलंबित

sakal_logo
By

पुणे,ता. १२ : ‘ब्रेकफेल’ होऊन बुधवारी झालेल्या बस अपघाताची पीएमपी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. बस देखभाल व दुरुस्तीचा दर्जा लक्षात यावा, याकरिता त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट केले जाणार आहे. पीएमपीने गुरुवारी सीओईपी म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला या संदर्भातले पत्र दिले आहे. तसेच कामात कसूर केल्याप्रकरणी शेवाळवाडी डेपोतील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बुधवारी पीएमपी बसचा ब्रेकफेल होऊन दोन रिक्षांना व तीन दुचाकींना ठोकले. यानंतर पुन्हा एकदा पीएमपी बसच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न चर्चेला आला. याप्रकरणात शेवाळवाडी डेपोतील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात डेपोतील चालक व यांत्रिक विभागाचे दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवसांत आरटीओदेखील अपघातग्रस्त बसची तपासणी करणार आहे. त्यावेळी अपघाताचे नेमके कारण समजेल. मात्र तत्पूर्वी पीएमपी प्रशासनाने देखभाल दुरुस्तीचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.


दररोज ३०० बसचे सर्व्हिसिंग

पीएमपीच्या सुमारे १५७० बस रोज वेगवेगळ्या मार्गावर धावतात, तर ताफ्यात सुमारे २ हजार बसेस आहेत. १३ डेपोतून दररोज सुमारे ३०० बसचे देखभाल दुरुस्ती केली जाते. यात डॉकिंग सह सर्व्हिसिंगचा देखील समावेश आहे. १८ हजार किमी प्रवास झाल्यावर डॉकिंग म्हणजेच चाक, हाफ ग्रेसींग,लायनर, आदी विविध कामे केली जातात. तसेच दर १० दिवसांनी नियमितपणे सर्व्हिसिंग केली जाते. असे मिळून प्रत्येक डेपोत रोज २० ते २२ गाड्याची देखभाल दुरुस्ती केली जाते.

घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अशा घटना पुन्हा होऊ नये या करिता आम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडून आमच्या मेंन्टनन्स चा ऑडिट करतील.
-डॉ चेतना केरुरे, सह व्यवस्थापकीय संचालक,पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62886 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top