
रुबी हॉल क्लिनिक लढणार कायदेशीर लढाई
पुणे, ता. १२ : मूत्रपिंडप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया रूबी हॉल क्लिनिकच्या वकील ॲड. मंजूषा कुलकर्णी यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘या प्रकरणामध्ये दुरान्वयानेही संबंध नसलेल्या रुग्णालयातील काही जणांची नावे फिर्यादीमध्ये दिली आहेत. अवयवदानाच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये नसलेल्या डॉ. परवेझ ग्रँट यांचे नाव त्यात घेणे अयोग्य आहे. अवयवदान करणाऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर प्रत्यारोपणाची प्रक्रिया पुढे करण्यात आली. आता रुग्णालयाला दिलेली कागदपत्रेच बनावट आहेत, ही माहिती पुढे येत आहे. रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण समितीला सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत, की बनावट आहेत, याची पडताळणी करण्याची कोणतीच यंत्रणा रुग्णालयाकडे नसते. ही यंत्रणा रुग्णालयात असली पाहिजे, असा आग्रह धरू शकत नसल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी आम्ही पुढील कायदेशीर लढाई लढू.’’
.................
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62904 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..