घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या
घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या

घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या

sakal_logo
By

पुणे, ता.१२ ः शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करून ऐवज चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७० ग्रॅम चांदी, टीव्ही असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला. गोरख विलास धांडे (वय २२, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेऊन त्यास निरीक्षणगृहामध्ये पाठविले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली होती. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने संबंधित मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा, गोरख धांडे हा संबंधित मुलाला बरोबर घेऊन घरफोडीचे गुन्हे करीत असल्याची माहिती त्याने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62905 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top