
अनुसुचित जाती कल्याण समिती एक जूनपासून पुणे दौऱ्यावर
पुणे, ता. १२ ः राज्य विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती येत्या १ जूनपासून चार दिवस पुणे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. गेल्या चार वर्षांच्या खंडानंतर यंदा ही समिती येत असून या समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणीतच शिंदे या आहेत. राज्य सरकारमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, त्यासाठी प्राप्त झालेला निधी, प्रत्यक्षात झालेला खर्च आणि या प्रवर्गातील कोणीही व्यक्ती सरकारी लाभापासून वंचित राहिला नाही ना, याचा आढावा घेणार आहे.
ही समिती पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय आयुक्तालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या शाळा, वसतिगृहांना भेटी देणार आहे. या समितीचा पुणे शहर व जिल्ह्यात चार दिवस मुक्काम असणार आहे. या कालावधीत विविध कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन ही समिती आढावा बैठका घेणार आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी (१ जून) सकाळी नऊ वाजता ही समिती येथील सरकारी विश्रामगृहावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, माजी महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विषय समित्यांचे माजी सभापती, विविध मागासवर्गीय संघटना आदींशी अनौपचारिक चर्चा करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन, शहर व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, अन्य सर्व कार्यालयांमधील अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि जातपडताळणीविषयक बाबींचा आणि या कार्यालयांमार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेणार आहे.
समितीच्या आढावा बैठकांचे वेळापत्रक
बुधवार, ता. १ जून २०२२
सकाळी ९ .३० ते ११ - जिल्हाधिकारी कार्यालय
सकाळी ११ ते दुपारी १ - पुणे जिल्हा परिषद
दुपारी १ ते २ - सहायक आयुक्त (समाजकल्याण) कार्यालय
दुपारी ३ ते सायंकाळी ५ - पुणे महानगरपालिका
सायंकाळी ५ ते ६ - सामाजिक न्याय आयुक्तालय
गुरुवार ता. २ जून २०२२
सकाळी ९.३० ते १०.३० - क्रीडा व युवक कल्याण संचालनालय.
सकाळी १०.३० - महावितरण कंपनी कार्यालय
सकाळी ११ वाजता - कृषी आयुक्तालय
दुपारी १२ वाजता - अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
दुपारी १२.३० वाजता - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय
दुपारी १ वाजता - उपवनसंरक्षक कार्यालय
दुपारी १.३० वाजता - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
दुपारी ३ ते सायंकाळी ७ - महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा
शुक्रवार, ता. ३ जून २०२२
सकाळी ९.३० वाजता - बार्टी भेट
सकाळी ११ ते दुपारी १२.३० - पिंपरी चिंचवड महापालिका भेट
दुपारी १२.३० ते १.३० - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा आढावा
शनिवार, ता. ४ जून २०२२
सकाळी ९.३० वाजता - पुणे शहर पोलिस आयुक्तालय भेट
सकाळी ११ वाजता - विभागीय परिवहन कार्यालय, पुणे
सकाळी ११.३० वाजता - राज्य उत्पादन शुल्क विभाग
दुपारी १२.३० वाजता - सहसंचालक (हत्तीरोग व हिवताप) कार्यालय
दुपारी १.३० वाजता - शिक्षण उपसंचालक कार्यालय (प्राथमिक, माध्यमिक)
दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत ः जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम आढावा बैठक.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62909 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..