सेवा, साधना, सत्संगातून साजरा होणार श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा, साधना, सत्संगातून साजरा होणार श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस
सेवा, साधना, सत्संगातून साजरा होणार श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस

सेवा, साधना, सत्संगातून साजरा होणार श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस

sakal_logo
By

पुणे,ता.१२ : जगाला जीवन जगण्याची कला शिकवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस शुक्रवारी (ता. १३) सेवा, साधना आणि सत्संगासह विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्त शहराच्या विविध भागात रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिरात गुरुपूजा, ध्यान प्राणायाम, सत्संग आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात ते रात्री नऊ दरम्यान हा कार्यक्रम होत असून तो सर्वांसाठी खुला आहे.
दरम्यान, हिंगणे खुर्द, आनंदनगर येथील जगताप स्कूलमध्ये सकाळी आठ ते दहा या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
तसेच बाजीराव रोडवरील आप्पा बळवंत चौक येथील आनंद आश्रमात सकाळी साडेनऊ ते दोन तर स्वारगेटजवळील गणेश कला मंदिराशेजारी जनकल्याण रक्तपेढी येथे सायंकाळी चार ते आठ या वेळेत नागरिक रक्तदान करू शकतील. रविवारी (ता.१५) काही ठिकाणी रक्तदान शिबिर होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62910 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top