
बालगंधर्व‘बालगंधर्व’मधील बदल अभ्यास दौऱ्यानंतरच्या बदलाचे नियोजन अभ्यास दौऱ्यानंतर
पुणे, ता. १२ ः बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नवे नाट्यगृह बांधले जाणार असल्याची चर्चेला आणि वादाला सुरवात झाली आहे. पण आता नेमका बदल कसा होणार, नवीन आराखडा कसा असणार यावर महापालिका प्रशासन अंतिम निर्णयावर आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबईतील नाट्यगृह पाहिल्यानंतर आता पुढील नियोजन ठरणार आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा साथीदार असलेल्या बालगंधर्वचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामध्ये ८००, ५०० आणि ३०० आसन क्षमतेचे प्रत्येकी एक नाट्यगृह, दोन आर्ट गॅलरी, खुले रंगमंच, वाहनतळ असे नवे नाट्यगृह बांधले जाणार आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. महापालिकेच्या समितीने २४ पैकी एक प्रस्ताव अंतिम करून तो उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सादर केला. त्यासंदर्भात गेल्याच आठवड्यात बैठक झाली. त्यानंतर बालगंधर्वचा पुनर्विकासास पाठिंबा आणि विरोध या दोन्ही बाजूने चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी नवे बालगंधर्व रंगमंदिर भव्य असले पाहिजे, त्याचे आतील सुशोभीकरण उच्च दर्जाचे असावे अशा सूचना देतानाच मुंबईतील बीकेसीतील नाट्यगृह पाहून येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे सादरीकरण केलेल्या प्रस्तावात मोठ्याप्रमाणात बदल होणार आहेत, तसेच मोठ्या सभागृहाची क्षमता किमान २०० ने वाढवून ते एक हजारपर्यंत न्यावे लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे अधिकाऱ्यांचा हा दौरा व त्यानंतर अभ्यास झाल्याशिवाय बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने पुढील पाऊल पडणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62919 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..