प्रत्यारोपण कायदा राबविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह? प्राण वाचविण्यांवरच गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्यारोपण कायदा राबविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
प्राण वाचविण्यांवरच गुन्हा दाखल
प्रत्यारोपण कायदा राबविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह? प्राण वाचविण्यांवरच गुन्हा दाखल

प्रत्यारोपण कायदा राबविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह? प्राण वाचविण्यांवरच गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : शहरात गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणात बुधवारी रात्री अखेर गुन्हा दाखल झाला. त्यावर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र पडसाद उमटले. रुग्णाचा प्राण वाचविणारे आणि अवयवाची खरेदी-विक्री करणारे यांना एकाच तराजूत तोलले गेल्याच्या प्रतिक्रिया पुढे आल्या आहेत. रूबी हॉल क्लिनिकने कायदेशीर लढाई लढण्याचे भूमिका घेतली तर, सरकारी यंत्रणांनीही मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पुन्हा अधोरेखित केली.


पुणे, ता. १२ : डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचविले, अशा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल होणे हे अत्यंत घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रातून आली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे म्हणाल्या, ‘‘या प्रकरणात डॉक्टरांचा दोष असू शकत नाही. कारण, दाता निवडीमध्ये डॉक्टरांची कोणतीच भूमिका नाही. शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांचे काम. ते त्यांनी चोख केले आहे. खोटं बोलून, चुकीची माहिती देऊन भविष्यात अवयव प्रत्यारोपण करता येणार नाही, अशी नवीन नियमावली तयारी करावी लागणार आहे. रुग्णाने सांगितलेली माहिती खरी आहे की खोटी याची खातरजमा करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असू शकत नाही.’’

‘आयएमए’च्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे सचिव डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी रुग्णाचे प्राण वाचविले आहेत. योग्य उपचार केले. त्यांनी अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेतील कागदपत्र तपासणीत डॉक्टरांची कोणतीच भूमिका नसते. डॉक्टरांचे काम कागदपत्र पडताळणी करणे हे नसून फक्त योग्य शस्त्रक्रिया करणे हे आहे. ती जबाबदारी डॉक्टरांनी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. म्हणूनच अवयवदाता आणि ग्राही दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे हे सामाजिकदृष्ट्या योग्य नाही.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62923 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top