गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ः महापालिकेची निवडणूक शांततेत पार पडावी, यादृष्टीने शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिल्या.

येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजू शकते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक उपस्थित होते.

पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोका), झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कायदा, स्थानबद्धता (एमपीडीए), तडीपारी अशा त्रिसूत्रीच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक बसविला आहे. निवडणुकीच्या कालावधीतही याच पद्धतीने गुन्हेगारांवर वचक राहिला पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यादृष्टीने विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.’’ प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संबंधित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिल्या.

सायबर गुन्ह्यांबाबत प्रशिक्षण

शहरातील सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्यांची, तक्रारींची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांबाबत पोलिस आयुक्तालयात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीच्या प्रारंभी सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तर दुसऱ्या सत्रात सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना (गुन्हे) प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यामध्ये सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारीही सहभागी होते. व्हॉटस्‌अप, फेसबुकवरुन झालेल्या गुन्ह्यांचा तपास करताना आवश्‍यक माहिती दोन्ही समाजमाध्यमांकडून कशी मागवावी, त्यासाठीची अर्ज प्रक्रिया कशी करावी, याबाबत व्हॉटस्‌अप व फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणात माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62925 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top