भारती विद्यापीठाचा सोमवारी पदवी प्रदान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठाचा सोमवारी पदवी प्रदान सोहळा
भारती विद्यापीठाचा सोमवारी पदवी प्रदान सोहळा

भारती विद्यापीठाचा सोमवारी पदवी प्रदान सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : भारती अभिमत विद्यापीठाचा २३वा पदवी प्रदान समारंभ सोमवारी (ता. १६) आयोजित करण्यात आले आहे. या वेळी देशाचे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारती विद्यापीठाच्या पुणे-सातारा रस्ता येथील शैक्षणिक संकुलात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ‘नॅक’च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, प्र-कुलगुरू आणि राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक अँथनी रोज, कुलसचिव जी. जयकुमार या वेळी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात आठ हजार १६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तर ४७ विद्यार्थ्यांना पीएच.डी आणि ४६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके दिली जातील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.

डॉ. साळुंखे म्हणाले,‘‘गेल्या सव्वीस वर्षांत भारती विद्यापीठाने गुणवत्तेच्या बळावर देदीप्यमान कामगिरी करून नामांकित विद्यापीठ म्हणून लौकिक मिळवला आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62999 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top