‘इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना आयुष्य डॉक्टर संबोधावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना 
आयुष्य डॉक्टर संबोधावे’
‘इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना आयुष्य डॉक्टर संबोधावे’

‘इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना आयुष्य डॉक्टर संबोधावे’

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रोपॅथी, इलेक्ट्रोहोमिओ चिकित्सा उपचार करणाऱ्यांना व्यवसाय परवाना द्यावा, तसेच त्यांना आयुष डॉक्टर असे संबोधावे. त्यांना त्यांच्या चिकित्सालयात इलेक्ट्रो होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीने उपचार करत असताना ते बोगस डॉक्टर या सदरात येत नाही, असा स्पष्ट आदेश परिपत्रकाद्वारे राज्य सरकारने प्रसिद्ध करावे, अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र इलेक्ट्रो-होमियोपॅथी संयुक्त समितीतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पुण्यात देण्यात आले. राज्यातील एकूण सात इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटना व जुनी संघटना मेपा यांनी एकत्र येऊन इलेक्ट्रोहोमिओपॅथी संयुक्त समिती स्थापन केली आहे. या वेळी संघटनेचे धर्मेंद्र शहा, सुनीता कुंदुर, रत्नप्रभा जाधव, मल्लेश गजेंगी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63002 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top