भिडे वाडा: ऐतिहासिक वारशाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष मद्याच्या पार्टीचा प्रकार उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिडे वाडा: ऐतिहासिक वारशाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 
मद्याच्या पार्टीचा प्रकार उघडकीस
भिडे वाडा: ऐतिहासिक वारशाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष मद्याच्या पार्टीचा प्रकार उघडकीस

भिडे वाडा: ऐतिहासिक वारशाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष मद्याच्या पार्टीचा प्रकार उघडकीस

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला भिडे वाडा; म्हणजेच देशातील मुलींची पहिली शाळा. मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या या वाड्याचा पाया आता खचला आहे. एवढेच नव्हे तर हा वाडा सध्या बिकट परिस्थितीत असून येथे मद्याच्या बाटल्या, बिछाना टाकल्याचे उघडकीस आले आहे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या वाड्यात आता दारूच्या पार्ट्या आणि व्यसनांचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
या वाड्याच्या खोल्यांमध्ये मद्याच्या बाटल्या, वेफरच्या पाकिटांचा कचरा, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच पडल्याचे पाहायला मिळते. तसेच जमिनीवर घातलेला बिछाना, दोरीवर वाळत घातलेले कपडेही असे प्रकार निदर्शनास येत आहे. वाड्याची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था पाहून त्याचा बचाव करण्यासाठी ‘भिडे वाडा बचाव मोहीम’ने पुढाकार घेतला आहे.
भिडे वाड्यात घडणाऱ्या गैरप्रकाराविरोधात फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेंद्र लांडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘भिडे वाडा बचाव मोहिमे’चे संस्थापक प्रशांत फुले आणि पाक्षिक अरिहंतच्या मुख्य संपादिका गीताई गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.

देशातील मुलींची पहिली शाळा अशी ओळख असणारा हा वाडा दारूचा अड्डा बनला आहे. येथे पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. महापालिकेचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकर याकडे लक्ष घालून या वाड्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमावा. कोणतीही वास्तूला राष्ट्रीय स्मारक जाहीर करण्यात येते, तेव्हा वास्तूची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी तेथे सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक आहे. असे असूनही आजपर्यंत येथे महापालिकेने सुरक्षारक्षक नेमला नसल्याचे या निवदेनात नमूद केले आहे.

भिडे वाड्याच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तातडीने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा. तसेच भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक उभारून येथे पुन्हा मुलींसाठी शाळा सुरू कवी.
-प्रशांत फुले, संस्थापक, भिडे वाडा बचाव मोहीम

63952
63951

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63012 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top