
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उद्या स्वच्छ अभियान
पुणे, ता. १३ : रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुण्याच्या पाच परिमंडळातील विविध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ६० झोपडपट्ट्यांमध्ये रविवारी (ता. १५) स्वच्छ मोहीम राबविण्यात
येणार आहे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नगररोड-वडगावशेरी , येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय तसेच ढोले -पाटील, औंध-बाणेर, शिवाजीनगर- घोले रस्ता, कोथरूड-बावधन, धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मुंढवा आणि वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ३९० झोपडपट्टयांपैकी ६० झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये इच्छुक स्वयंसेवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63040 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..