
आयशर ट्रॅक्टर्सकडून ‘प्राइमा जी : ३’ लाँच
पुणे, ता. १३ ः जगातील अग्रगण्य असलेल्या टॅफे - ट्रॅक्टर्स अॅण्ड फार्म इक्विपमेंट लिमिटेड समूहाच्या ‘आयशर ट्रॅक्टर्स’ने ‘आयशर प्राइमा जी :३’ सीरीज लाँच केली आहे. आधुनिक भारतीय शेतकऱ्यांना लक्षात घेऊनही ही सीरीज तयार करण्यात आली आहे.
सर्वोत्तम स्टाइल, कार्यक्षम आणि बळकट अशा ४०-६० एचपी रेंज ट्रॅक्टरची निर्मिती या सीरीजमध्ये केली आहे. नवीन युगातील एरोडायनॅमिक बोनेटसह या सीरीज येतो. त्यामुळे ट्रॅक्टरची देखभाल करणे सोपे होते. उच्च तीव्रतेची थ्रीडी कुलिंग टेक्नोलॉजीसोबत बोल्ड ग्रिल, रॅप-अराऊंड हेडलाईट असून डिजिटल डॅशबोर्डही दिसण्यास आकर्षक आहे.
‘आयशर प्राइमा जी : ३’ सीरीज लाँच करताना ‘टॅफे’च्या सीएमडी मल्लिका श्रीनिवासन म्हणाल्या, ‘‘दशकांपासून आयशर ब्रँड, कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विश्वास आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो. या सीरीजमुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत अधिक परतावा मिळण्याचा पर्याय मिळेल.’’
‘टॅफे’च्या डेप्युटी एमडी डॉ. लक्ष्मी वेणू म्हणाल्या, ‘‘देशातील तरुण आणि प्रगतीशील शेतकरी तंत्रज्ञान आणि कृषी-तांत्रिक उपायांवर लक्ष केंद्रित करून शेती कार्यामधून जास्तीत जास्त नफा मिळवू इच्छितो. त्यांच्यासाठी ‘प्राइमा जी : ३’ शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी एक आदर्श भागीदार म्हणून भूमिका बजावेल.’’
‘टॅफे’चे सीईओ. संदीप सिन्हा म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाची स्टाइलिंग आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ‘जी : ३ सीरीज’ लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘आयशर’च्या मुख्य मानक टिकाऊपणा आणि विश्वसनीयतेचे प्रतिबिंब या सीरीजमध्ये असून ‘प्राइमा’ ग्राहकांना सहज उपलब्ध होईल.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63057 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..