मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरातील कोंडी सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगेशकर रुग्णालयाच्या
परिसरातील कोंडी सुटणार
मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरातील कोंडी सुटणार

मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरातील कोंडी सुटणार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : डीपी रस्ता ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दरम्यानच्या रस्त्यावरील नाल्यावर कलव्हर्ट (छोटा पूल) बांधण्यास महापालिकेच्या सर्व खात्यांची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातील कोंडी सुटणार आहे.

रुग्णालय प्रशासनाने डीपी रस्त्यावरील (म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान) एक भूखंड खरेदी केला असून तेथून रुग्णालयापर्यंत रस्ता करण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच येथील नाल्यावर कलव्हर्ट बांधण्यास महापालिकेच्या सर्व संबंधित खात्यांची परवानगी मिळाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली.
या पुलाच्या उभारणीचा सर्व खर्च दीनानाथ मंगेशकर रुग्णालय करणार असून त्याबद्दल लवकरच रुग्णालया प्रशासनाचा नागरिकांच्यावतीने सत्कार करणार असल्याचेही खर्डेकर यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात या पुलाची उभारणी पूर्ण होईल आणि रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुग्णालय परिसरातील कोंडी सुटण्यासाठी खर्डेकर यांनी रुग्णालय प्रशासनाशी नुकतीच चर्चा केली. त्यावेळी प्रशासनाने भूखंड आणि पुलाबाबत माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63072 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top