
पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन साजरा
पुणे, ता. १३ : वेदघोष, मंत्रपठण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार, पारितोषिक वितरण, सदिच्छा भेटी, स्नेहमेळावा अशा विविध कार्यक्रमांनी पुणे विद्यार्थी गृहाचा ११३वा वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक दादासाहेब केतकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास या वेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पूर्णिमा लिखिते यांच्यासह कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष एस. एम. जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी आदी उपस्थित होते. संस्थेच्या आवारातील राम-लक्ष्मण मंदिरात रेडेकर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी रमेशचंद्र कुलकर्णी (वय ८४) यांचे ‘पत्रसंवाद भाग १ व २’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. पुस्तक विक्रीच्या रकमेतून एक लाख रुपयाची देणगी कुलकर्णी यांनी संस्थेला दिली. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ‘मला संस्थेने काय दिले’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाइन स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63085 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..