‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ पुस्तकाचे पुनर्प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ पुस्तकाचे पुनर्प्रकाशन
‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ पुस्तकाचे पुनर्प्रकाशन

‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ पुस्तकाचे पुनर्प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : महाराष्ट्रातील पाऊस, पाणी, जमीन, नद्या असा सर्वांगीण शास्त्रशुद्ध अभ्यास मांडणारे नरहर आपटे यांचे ‘महाराष्ट्रातील पाणीपुरवठा’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुनर्प्रकाशित करण्यात आले.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांच्याकडे या पुस्तकाची प्रत मिळाली असून या पुस्तकाचे पुनर्संपादन डॉ. चाकणे आणि प्रसेनजीत फडणवीस यांनी केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रा पवार, डॉ. महेश आबाळे, अधिष्ठाता डॉ.संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे, मुद्रणालय व्यवस्थापक डॉ. दत्तात्रेय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. करमळकर म्हणाले,‘‘राज्यातील पाण्याबाबतची संपूर्ण प्राथमिक माहिती या पुस्तकात आहे. भूगर्भशास्त्राचा प्राध्यापक म्हणून राज्यातील ही अनेक वर्षे जुनी माहिती, संदर्भ लोकांसमोर यावे असे वाटते, म्हणून पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला.’’

१९६० सालातील प्रकाशन

विद्यापीठाच्या मुद्रणालयातून १९६० मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते. विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाकडून संबंधित पुस्तक लिहिण्याची सूचना केली होती. त्यानुसार हे पुस्तक त्यावेळचे अनेक संशोधनपर अभ्यास, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील अभ्यासाचे संदर्भ देत लिहिण्यात आले. पुस्तकात महाराष्ट्रातील पाण्याचा मूळ स्रोत, ते साठवण्यामागचं शास्त्र, जमिनीचा प्रकार, नद्या, नद्यांचे क्षेत्रफळ, तलाव, शेती, विहिरी अशी सर्व माहिती आकडेवारीसह प्रकाशित केली आहे, असे डॉ. चाकणे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63101 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top