अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

‘बीएआय’च्या नवीन कार्यकारिणीचे पदग्रहण
पुणे ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) च्या पुणे सेंटरच्या २०२२-२३ कार्यकारिणीचा पदग्रहण कार्यक्रम नुकताच झाला. रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र आठले, राज्याचे अध्यक्ष दत्तात्रेय मुळे आदी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष अशोक अटकेकर यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष हरप्रितसिंग आनंद यांनी पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी डी. एस. चौधरी, मानद सचिव अजय गुजर, मानद खजिनदार महेश मायदेव यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

आयटी एक्स्पोला उस्फूर्त प्रतिसाद
पुणे ः कॉनरॅड हॉटेल येथे आयोजित दोन दिवसीय सीएमडीए आयटी एक्स्पो नुकताच झाला. कॉम्प्युटर्स ॲण्ड मीडिया डीलर्स असोसिएशनतर्फे आयोजित एक्स्पोला तीन हजाराहून अधिक वितरक सहभागी झाले होते. प्रदर्शनाचे उद्‍घाटन सुपरट्रॉन इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष व्ही. के. भंडारी, तोशिबा इंडियाचे पोलार्ड गार्डा, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63110 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top