ग्राहकाला दांडक्‍याने मारहाण; भाजी विक्रेत्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकाला दांडक्‍याने मारहाण;
भाजी विक्रेत्यावर गुन्हा
ग्राहकाला दांडक्‍याने मारहाण; भाजी विक्रेत्यावर गुन्हा

ग्राहकाला दांडक्‍याने मारहाण; भाजी विक्रेत्यावर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ग्राहकाने वेगवेगळ्या भाज्यांचा भाव विचारल्यानंतर दुसऱ्याच विक्रेत्याकडे भाजी खरेदी केली. त्या रागातून विक्रेत्याने ग्राहकाला लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली. हा प्रकार ३ मे रोजी बी. टी. कवडे रस्त्यावर घडला. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी दिनेश जयेंद्र प्रसाद (वय ३४, रा. उदय बाग, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अब्दुल नावाच्या भाजी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घोरपडी येथील उदय बाग परिसरातील पदपथावर अब्दुल हा भाजी विक्री करतो. दिनेश प्रसाद हा त्याच्याकडे भाजी खरेदीसाठी गेला. त्यावेळी त्याने त्याच्याकडे वेगवेगळ्या भाज्यांचे भाव विचारले. मात्र, अब्दुलकडील भाजीचे भाव जादा असल्याने त्याने त्याच्या शेजारीच असलेल्या दुसऱ्या भाजी विक्रेत्याकडेही भाज्यांची चौकशी करून त्याच्याकडून भाज्यांची खरेदी केली. त्याचा राग आल्याने अब्दुलने फिर्यादी प्रसादला दांडक्‍याने मारहाण केली. त्याने फिर्यादीच्या तळहातावर चाकूने वार केले. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. त्याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, भाजी विक्रेता पसार झाला असून वानवडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63151 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top